स्वच्छता प्रतिज्ञा

Translated to Marathi by Chinmay Madhu Ghaisas from the Department of Marathi

महात्मा गांधींनी अशा भारताचे स्वप्न पाहिले जो केवळ स्वतंत्र नसेल तर स्वच्छ आणि प्रगत सुद्धा असेल. महात्मा गांधींनी भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून दिले. आपला देश टापटीप आणि स्वच्छ ठेवून भारतमातेची सेवा करणे हे आता आपले कर्तव्य आहे.


मी प्रतिज्ञा घेतो/घेते की, मी स्वच्छतेविषयी कटिबद्ध राहीन आणि त्यासाठी वेळ देईन. स्वच्छतेसाठी स्वेच्छेने काम करण्यास, मी वर्षाकाठी १०० तास म्हणजेच दर आठवड्याचे दोन तास देईन.


मी अस्वच्छता करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही. स्वच्छतेच्या ध्यासाची सुरुवात मी स्वत:पासून; माझे कुटुंब, माझा परिसर, माझा गांव आणि माझे कार्यालय यांच्यापासून करेन.


जगातील जे देश स्वच्छ असल्याचे नजरेस पडतात, त्याचे कारण म्हणजे तेथील नागरिक कोणत्याही प्रकारे अस्वच्छता करीत नाहीत किंवा अस्वच्छता होऊ देत नाहीत. या ठाम विश्वासासह, मी स्वच्छ भारत मोहिमेचा संदेश गांव आणि शहरांपर्यंत पोहोचवेन.


आज मी घेत असलेली ही प्रतिज्ञा घेण्यासाठी मी अन्य १०० व्यक्तींना प्रेरित करीन. स्वच्छतेसाठी त्यांनी आपले १०० तास द्यावेत यासाठी मी झटेन.


मला पूर्ण विश्वास आहे की, स्वच्छतेसाठी मी उचललेल्या प्रत्येक पावलामुळे माझा देश स्वच्छ होण्यास मदत होईल.



Swachhata Pledge Taken in Marathi 5006 Times